जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेएफएस अंकुर झुनझुनवाला यांचा अकोला व खामगांव रिजन दौरा
खामगांव- जेसीआय ही एक आंतरराष्ट्रीय नेतृत्व विकास संस्था आहे. जी तरूणांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करते. ही संस्था १०० हून अधिक देशांमध्ये सक्रीय आहे आणि भारतात जेसीआय इंडिया म्हणून कार्यरत आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील तरूणांना नेतृत्व, व्यवसाय, सामाजिक जबाबदारी आणि वैयक्तीक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेएफएस अंकुर झुनझुनवाला यांचा झोन १३ च्या अकोला व खामगांव रिजनचा बहुप्रतिक्षीत दौरा २४ जुन रोजी होणार आहे. ही भेट नेतृत्व, संघटनात्मक विकास आणि युवा प्रेरणेचे प्रतीक आहे. या ऐतिहासीक प्रसंगाबद्दल सर्व स्थानिक संस्था अत्यंत उत्साहीत असून या कार्यक्रमाची भव्य तयारी करीत आहेत. जेएफएस अंकुर झुनझुनवाला यांचे भव्य स्वागत, स्थानिक संस्थांनी केलेल्या सामाजिक प्रकल्पांचे सादरीकरण, जेसीआय व्हीजन २०२५ वर अध्यक्षीय मार्गदर्शन, नेतृत्व विकासावरील संवाद सत्र, जेसी सदस्यांचा सन्मान समारंभ, नेटवकींग आणि फलोशीप इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
झोन नेतृत्व झोन अध्यक्ष जेसी कुशल झंवर, टूर समन्वयक जेसी शालिनी राजपुत व जेसी सौरभ गट्टाणी, झोन गव्हर्निंग बोर्ड सदस्य जेसी कुणाल राठी, जेसी राम जाधव, जेसी रवि बुधे, जेसी प्रशांत खोडके, जेसी गौरव गोयनका, जेसी प्रणवेश राठी, जेसी प्रविण बनसोड, जेसी रसिकराज कोठारी, स्थानिक संघटना जेसीआय खामगाव सिटी अध्यक्ष जेसी साकेत गोयनका, जेसीआय खामगांव जय अंबे जेसी दिनेश वाधवाणी, जेसीआय अकोला जेसी शारदा लखोटीया, जेसीआय अकोट जेसी कृष्णन बजाज, जेसीआय भुसावळ ताप्ती जेसी सुचित्रा अग्रवाल, जेसीआय जळगांव जेसी अभिलाष राठी, जेसीआय चिखली जेसी दिपा अग्रवाल, जेसीआय जळगांव जामोद जेसी प्रसनजित मिश्रा, जेसीआय अकोला यंगिस्तान जेसी गोविंद भाला, जेसीआय पाचोरा जेसी दिग्वीजय पटवारी, जेसीआय वाशिम जेसी पंकज बांडे, जेसीआय शेगांव विजय गव्हाड, जेसीआय अकोला शहर जेसी आनंद डागा, जेसीआय अंजनगांव जेसी अमोल रासे, जेसीआय रिसोड जेसी प्रतीक अग्रवाल, जेसीआय शेगांव माऊली जेसी मनीष तायडे, पास्ट नॅशनल प्रेसीडेन्ट निलेश झंवर, जेसी मनोज चांडक, जेसी शैलेश महाजन, जेसी गोपाल पटवारी, जेसी सुनिल अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे.

إرسال تعليق