खामगांव येथील मोहंमद फरहान 'कूडो वर्ल्ड कप स्पर्धा-२०२५' मध्ये महाराष्ट्रातून भारताचे प्रतिनिधीत्व करणार
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक बड़े प्लॉट येथील रहिवासी नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती मोहंमद नईम यांचा मुलगा मोहंमद फरहान याची १ जुलै ते ९ जुलै २०२५ रोजी बल्गेरिया येथे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील २७० पी.आय. पुरुष गटात महाराष्ट्रातून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली आहे.
यापुर्वी मोहमंद फरहान याने १९ वर्षाखालील २७० पी.आय. पुरुष गटात भारताचे वतीने प्रतिनिधीत्व करुन सन २०२४ मध्ये येरेवान, अरमेनिया (युरोप) येथे 'युरेशियन कूडो कप-२०२४' स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केले होते.त्यानंतर सन २०२४ मध्ये अक्षयकुमार १६ व्या आंतरराष्ट्रीय कुडो टुर्नामेंट, १५ व्या राष्ट्रीय कुडो स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले होते व ५ व्या कुडो फेडरेशन कप स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले तसेच ३ ऱ्या कुडो राष्ट्रीय चॅम्पीयनशिप कप २०२५-२६ मध्ये २१ वर्षाखालील गटात पी.आय. २७० पुरुष गटात गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. अशाप्रकारे सलग तिसऱ्यांदा गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
तसेच मोहंमद फरहान याने यापूर्वी अक्षयकुमार १५ व्या आंतरराष्ट्रीय कुडो टुर्नामेंट, १४ व्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कुडो स्पर्धेत सुध्दा सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.मोहंमद फरहान याची नुकत्याच ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरत गुजरात येथे झालेल्या ट्रायल मध्ये बल्गेरिया येथे होणाऱ्या कूडो वर्ल्ड कप स्पर्धे करीता सुध्दा निवड झाली आहे.
कूडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तो आपल्या निवडीचे श्रेय कुडो असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्रभाऊ रोहणकार, उपाध्यक्ष सुनिल वानखडे, व प्रशिक्षक राजेश सोनले सर व अंबिका क्रिडा मंडळाचे पदाधिकारी तसेच आई वडिलांना देतो.

Post a Comment