ज्या विज ग्राहकांचे मिटर काढुन नेले त्यांना परत विद्युत कनेक्शन देऊन बिलामध्ये सवलत द्या- लहुजी विद्रोही सेना
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- ज्या पि डी ग्राहकांचे मिटर काढुन नेले त्यांना त्वरित अर्धे पैशे भरुन नविन मिटर बसविण्यात यावे व ज्या ग्राहकांचे बिल जास्त आले आहे ज्या ग्राहकांना दोन ते तीन पेशै भरण्याची सवलत देण्यात यावी कारण काही ग्राहकांची अर्थीक परीस्थीती खराब असल्याने पुर्ण पैशे एका वेळेस पैशे भरण्याची ऐपत नाही. वीज कर्मचारी येऊन ग्राहकांना पैशे भरण्यासाठी मजबुर करतात. नाही भरले कि त्यांची लाईट कट करतात. सद्या पाण्या पावसाळ्यांचे दिवस असुन सर्प बिच्छु डसण्याची दाट शक्यता असते त्यामुळे अंधारात जर कोणाला काही दुखापत झाल्यास त्यास आपले प्रशासन जबाबदार राहिल अशा आशयाचे निवेदन आज विद्युत अधिकाऱ्यांना लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी लहुजी विद्रोही सेनेचे बुलढाणा जिलाध्यक्ष लहुश्री रुपेश भाऊ अवचार ,नामदेव अवचार ,आकाश गायकवाड़, सागर अवसरमोल ,निलेश धमेरीया ,सचिन अवचार आधी उपस्थित होते.

إرسال تعليق