जेसीआय खामगांव सिटी तर्फे रक्त रविवारी तपासणी शिबीर
खामगांव - जनोपचार न्यूज नेटवर्क :- जेसीआय खामगांव सिटी तर्फे संपुर्ण रक्त तपासणी शिबीराचे आयोजन रविवार दि. ८ जुन २०२५ रोजी सकाळी ७ ते ११ वाजे दरम्यान स्थानिक अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल, बालाजी प्लॉट, खामगांव येथे करण्यात आले. या शिबीरामध्ये संपूर्ण रक्त तपासणीचा खर्च रू. ४०००/- च्या वर येत असतांना फक्त रू. ९५०/-मध्ये करण्यात येणार आहे.
![]() |
| जाहिरात |
यामध्ये पुर्ण रक्त गणना (हिमोग्राम), ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन (Hbalc), थायरॉईड प्रोफाईल (९), यकृत कार्य चाचणी (१२), मूत्रपिंड प्रोफाईल चाचणी (७), GFR (ग्लोमेरूलर फिल्ट्रेशर रेट) (१), इलेक्ट्रोलाइट्स (NA+K+CL+) (३), व्हिटॅमिन बी१२ (१), २५ OH व्हिटॅमिन D३ एकूण (१) अशा विविध प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणीच्या वेळी उपाशी पोटी यावे. तरी इच्छुकांनी विनम्र पगारीया मो. ९७६२९०१८८९, ८३६९९१६१८४, ९४२२९२६६६२ या क्रमांकावर संपर्क साधुन आपले नांव नोंदवावे असे आवाहन जेसीआय खामगांव सिटीतर्फे करण्यात आले आहे.


إرسال تعليق