सीए इंटरमीडिएट परीक्षेत प्रणव बगाडे चे सुयश 

खामगांव - 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडियाकडून (आयसीएआय) देशभरातून घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट 2024 परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून त्यामध्ये प्रणव बगाडे  उत्तीर्ण झाला आहे.



   प्रणव याने दिल्ली अनअकॅडमीच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करत एकूण600पैकी 318  गुण घेत  यश प्राप्त केले . सीए इंटरमीडिएट परीक्षेत एकूण 38629 विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी 5028 विद्यार्थी पास झाले, यामध्ये 13.22%निकाल लागला.

  अंत्रज गावातील  छोट्याशा खेड्यांमधून प्रणवने घेतलेली उत्तम भरारी ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी  प्रेरणादायी ठरते. विशेष म्हणजे सीए फाउंडेशन' परीक्षा प्रणव प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला होता.

या त्याच्या यशामुळे त्याची आई सौ रंजना बगाडे,वडील संजय बगाडे, आजी नलिनी बगाडे,  आजी सौ नंदाबाई जाधव, आजोबा पंडितराव जाधव, काका गणेश बगाडे, धनंजय बगाडे,काकू सौ नेहा बगाडे, सौ गायत्री बगाडे,मामा दिपक जाधव, राहुल जाधव- मामी सौ ज्योती जाधव, सौ सोनाली जाधव  व इतर आप्त परिवाराकडून कौतुक केल्या जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم