गुरूवर्य श्री वसंत महाराज अन्नकुटीवर पालखी निमित्त अनेक सेवा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आषाढी एकादशीला विठूरायांच्या भेटीसाठी पंढरपुरला गेलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आपल्या खामगाव नगरीत 30 जुलै 2025 रोजी आगमन होत आहे. दरवर्षी भाविक भक्तांकडून पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते व पालखी अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल येथे मुक्कामी थांबते. दुस·या दिवशी 31 जुलै 2025 ला सकाळी 5 वाजता पालखी शेगांवकडे प्रस्थान करते. त्या वेळेस लाखो भाविकभक्त महाराजांच्या सोबत पायी शेगांव पर्यंत जातात. खामगांव पासून शेगांव पर्यंत या भाविक भक्तांसाठी काही भाविक व समाजसेवी संघटना जागोजागी चहा पानी नाश्त्याची व्यवस्था करतात.
गुरूवर्य श्री वसंत महाराज अन्नकुटी परिवार गेल्या दहा वर्षापासून श्रींच्या दर्शनास पायी जाणा·या वारकरी व भाविक भक्तांच्या सेवेत अखंड कार्यरत आहे. अन्नकुटी परिवाराकडून आषाढी एकादशी निमित्त नुकताच 2 जुलै ते 5 जुलै 2025 पर्यंत पंढरपुर येथे अन्नदान करण्यात आले आहे. अन्नकुटी परिवाराचे असे धार्मिक व सेवाभावी कार्य वर्षभर सुरू असतात.
यावर्षी सुध्दा पालखी परतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै 2025 ला पालखी सोबतचे वारकरी व सर्व भाविक भक्तांसाठी अन्नकुटीवर गावरान गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा व पिण्याचे पाणी तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी स्त्री प्रसाधन गृह व पुरूष प्रसाधन गृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे. खामगांव ते शेगांव पालखी मार्गात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या ज्या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचा·यांच्या पालखी व्यवस्थापन कर्तव्य कामासाठी नेमलेले असते. अशा सर्व अधिकारी व कर्मचा·यांसाठी अन्नकुटी येथे चहा पानी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रस्त्याने आरोग्य सेवा देणारे सर्व डॉक्टर व त्यांचा स्टाफ तसेच खामगांव ते शेगांव रस्त्याची स्वच्छता राखणारे सर्व सेवाभावी संस्थेचे सफाई योध्दा या सर्वांसाठी अन्नकुटी येथे चहा पानी, भोजनाची व्यवस्था 31 जुलै 2025 रोजी दुपारी 11 ते 2 या वेळेत करण्यात आलेली आहे. या सर्वांनी अन्नकुटीवरील सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नकुटी परिवारामार्फत करण्यात आले आहे.

إرسال تعليق