40 दिव्यांगांना रेनकोट देऊन गुरुपौर्णिमा साजरी एकनिष्ठा फाउंडेशनचा उपक्रम
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क : येथील डी पी रोड स्थित विसडम एज्युकेशन खामगावात दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे गुरुपौर्णिमा निमित्त दिव्यांग बंधु भगिनी यांच्या सत्काराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपादक मनोज नगरनाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. लताताई गावडे, राजु पाटील घाटे, हैं होते .सर्वप्रथम प्रभु श्रीराम यांचे दर्शन व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेला हार फुल मालार्पण करून पुजन प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग बंधु आणि भगिनींना एकनिष्ठा फाउंडेशन करत असलेल्या निःस्वार्थ सेवा कार्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी दिली. एकनिष्ठा गौ -सेवा संस्थापक सचिव ज्ञानेश सेवक सर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्व पटवून दिले. सर्व दिव्यांग लोकांना रेनकोट गुलाबाचे फुल देऊन गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देत मान्यवरां कडून सत्कार करण्यात आले. यावेळी दिव्यांग मनोज नगरनाईक, शैलेश दांडगे, सौ. प्रिती दांडगे, मनोज धुंदे, सौ. शारदा धुंदे, सौ. प्रणिती देवगिरीकर, निलेश थोरात, ज्ञानदेव भोरे, गजानन क्षिरसागर, रामेश्वर बेंडोकार, सम्राट धुंदे, गुलाबराव निंबाळकर, सौ. तुळसा गिऱ्हे, कु. कविता इंगळे, ज्ञानेश्वर टाले, मंगेश ढगे, संतोष गाडगे, ज्ञानेश्वर भिसे, गजानन टिपकरी, उमेश देशमुख, सुनील टिपकरी, मनोज गणवाणी, वसंत चिखलकर, प्रमोद राऊत, शेखर तायडे, महादेव पांडे, महेंद्र छंगाणी, गणेश गिऱ्हे, गणेश भोपळे, आशा वाघ, विनोद पवार, गजानन देवगिरी, दिपक चिकणे, शत्रुघ्न इंगळे, प्रदीप वरुंडकर, मंगेश अंभुरे, नामदेव ताले, अजयदादा, अनिल खैवान, वैभव कापडे, मुन्ना सारसर आदि लोकांचा सत्कार करून त्यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा उपक्रम एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे राबविण्यात आला व तसेच नास्ता पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरजभैय्या यादव यांच्यासह खुशाल सेवक विसडम एज्युकेशन संचालक, सिद्धेश्वर निर्मळ, नरेश मसनेवार, चेतन कदम, ऍड. शामल गायगोळ, प्रदीप शमी, शुभम कुंडलवार, तुषार जोशी, सौरभ पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश सेवक यांनी केले तर आभार नरेश मसनेवार यांनी मानले.

إرسال تعليق