लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचा पदग्रहण समारंभ '५६ भोग' संकल्पनेवर आधारित, समाजोपयोगी कार्याची ग्वाही
खामगाव: दिनांक 5 जुलै 2025 शनिवार रोजी संध्याकाळी 7 वाजता लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचा पदग्रहण समारंभ श्री अग्रसेन भवन येथे नुकताच पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (PDG) पीएमजेएफ लायन पुरुषोत्तमजी जयपुरीया यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, इन्स्टॉलिंग ऑफिसर पुरुषोत्तमजी जयपुरीया यांनी '५६ भोग' या संकल्पनेवर आधारित एका अत्यंत अनोख्या आणि मनोरंजक पद्धतीने पदग्रहण विधी पूर्ण केला. यात त्यांनी ५६ प्रकारच्या खाद्यपदार्थांचे महत्त्व आणि त्यांचा आज शपथ घेणाऱ्या क्लबच्या नेत्यांशी व संचालकांशी असलेला संबंध अत्यंत प्रभावीपणे उलगडला.
कार्यक्रमाची सुरुवात लायन सौ. सपना डी. मुनोत यांच्या परिचयपर भाषणाने झाली, ज्यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर पुरुषोत्तमजी जयपुरीया यांचा परिचय करून दिला. मावळते अध्यक्ष लायन शैलेश शर्मा यांनी आपल्या भाषणात गतवर्षातील कार्याचा आढावा घेतला. यानंतर लायन तेजेंद्र सिंग चौहान यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर लायन गजानन सावकार यांनी कोषाध्यक्षांचा अहवाल सादर करत आर्थिक स्थिती स्पष्ट केली. डिस्ट्रिक्ट च्या टीम मध्ये समाविष्ट अशे क्लब मेंबर्स डिस्ट्रिक्ट पिआरओ लॉ राजकुमार गोयनका, डिस्ट्रिक्ट जीएमटी कॉर्डीनेटर लॉ संजय उमरकर, डिस्ट्रिक्ट आयटी व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ उज्वल गोयंका, डिस्ट्रिक्ट जॉइंट ट्रेझरअर लॉ नरेश चोपडा , झोन 1 चे झोन चेयरपर्सन लॉ अभय अग्रवाल यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष एमजेएफ लायन आकाश अग्रवाल, सचिव लायन डॉ. निशांत मुखिया आणि कोषाध्यक्ष लायन सीए आशिष मोदी यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.नवनियुक्त अध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी आपल्या भाषणात, क्लबच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला
या पदग्रहण सोहळ्यात लायन्स क्लब खामगाव संस्कृतीने आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. अत्यंत कमी ऐकू येत असलेल्या श्री. दत्तात्रय दिवटे यांना चाळीस हजार रुपये किमतीचे श्रवणयंत्र (Hearing Aid) प्रदान करण्यात आले. हे श्रवणयंत्र क्लब सदस्य लायन अजय एस. अग्रवाल आणि एमजेएफ लायन अभय अग्रवाल यांच्या सौजन्याने दान करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमजेएफ लायन नरेश चोपडा आणि लायन देवेंद्र मुनोत यांनी केले. उपस्थितांचे आभारप्रदर्शन नवनियुक्त सचिव लायन डॉ. निशांत मुखिया यांनी केले. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा क्लबच्या सामाजिक कार्याची आणि एकोप्याची साक्ष देणारा ठरला. अशी माहिती क्लब व डिस्ट्रिक्ट प्रसिद्धी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.


إرسال تعليق