नाफेड कडून शेतकऱ्यांना मॅसेज..पण ज्वारी घेण्यास नाफेड चा नकार!
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी चा नाफेड केंद्रावर ठिया
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : नाफेड केंद्रावर 6 महिन्या अगोदर शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी साठी नोंदणी केली होती ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या आहेत अश्या शेतकऱ्यांना आज ज्वारी खरेदी सुरू होणार असल्याचा मॅसेज शेतकऱ्यांना आला त्यावरून शेतकरी आपला ज्वारी मला खरेदी विक्री केंद्रावर घेऊन आलेत मात्र खामगाव midc च्यव नाफेड खरेदी विक्री केंद्रावर कुणी ज्वारी मला घ्यायला तैयार नाहीत आम्हाला ज्वारी खरेदी करण्याचं पत्र अजून प्राप्त झालं नाही त्यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी शरद पावर गटाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी नाफेड केंद्रावरील गोडाऊन वर दाखल होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले मात्र जो पर्यंत आदेश येणार नाही तो पर्यंत ज्वारी खरेदी करणार नाही असा पवित्रा नाफेड ने घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक बुर्दंड बसला आहे तात्काळ शेतकऱ्यांनी आणलेल्या ज्वारी ची खरेदी करा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका संजय बगाडे हे आक्रमक झाले होते


إرسال تعليق