पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- दि २२ (उमाका) कौशल्य रोजगार व विभाग महाराष्ट्र राज्य पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा श्री सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव रोड येथे संपन्न झाला सुरुवातीला कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून मा. लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी फुले व हार अर्पण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अनंत कुलकर्णी हे होते.
![]() |
| जाहिरात |
मार्गदर्शन सत्रात प्रभारी बि.डि.ओ. रफिक शेख , उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता दत्ता ठाकरे, लोकप्रतिनिधी रघुनाथ खेर्डे इत्यादींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा ला गणेशजी बिटोडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा , जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा सुनिल पाटील, अमृत योजना जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र शासन जिग्नेश कमानी, प्राचार्य प्रीती चोपडे सिद्धिविनायक पॉलिटेक्निक खामगाव, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सतीश शेळके इत्यादी सह शेकडो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजश्री जाधव व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रद्धा कडूकार यांनी केले.



Post a Comment