पोलिसांचा छापा : महिलेच्या ताब्यातील दारू जप्त

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- अवैध व्यवसायात आता महिलांचाही पुढाकार दिसून येत असून शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका महिले करून विनापरवाना देशी दारूच्या शिषा जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगदंबा कॉलनी घाटपुरी येथे एक महिला अवैध दारू व्यवसाय करीत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास छापा टाकला. यावेळी तिच्या ताब्यात देशी दारु बॉबी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या 90ml च्या 20 नग कंपनी पॅक प्लॅस्टिकशिश्या प्रत्येकी किंमत 35/-रु प्रमाणे 700/-रु. व एक वायरची थैली किमंती 10/- रु. असा एकुण 710/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सर तर्फे पो. का.सतिष समासंग जाधव ब.नं. 2641, वय 35 वर्षे, पो.स्टे. शिवाजी नगर, खामगांव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post