कपाळी टिळा ,डोक्यात टोपी मुखी पांडुरंगाचा गजर!
राष्ट्रवादीच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत
खामगाव - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी केंद्र शासनाने खामगाव येथून भाविक भक्तांसाठी विशेष रेल्वेची सोय केली होती त्या रेल्वेने जाणाऱ्या भाविकांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले
हजारो वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याची आस लागली आहे त्यामुळे खामगाव रेल्वे स्थानकावर भक्ती मे वातावरण होते या भक्तीमय वातावरणात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळी टिळा आहे भगवी टोपी घालून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला . शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ,राज्यातील पाऊसमान चांगले पडू दे, अशी या चला सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाकडे करण्यात आली व हसत मुखाने हजारो वारकऱ्यांना दर्शनासाठी निरोप देण्यात आला यावेळी जिल्हा संघटक संभाजीराव टाले, ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष पेसोडे ,तालुका उपाध्यक्ष रामा कोकरे मोहन खोटरे युवा प्रतिनिधी शुभम राऊत महेश बोदडे व बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते

إرسال تعليق