लायन्स क्लब खामगाव संस्कृतीद्वारा डॉक्टर, सी.ए. आणि महाराष्ट्र शेतकरी दिनानिमित्त सत्कार संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने नुकताच डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) आणि महाराष्ट्र शेतकरी दिनाचे औचित्य साधून समाजातील या महत्त्वाच्या घटकांच्या योगदानाला गौरांवित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ भगतसिंग राजपूत , डॉ सोनल टिबडेवाल, डॉ निशांत मुखिया , डॉ परिक्षीत मानकर, डॉ सुचिता मानकर यांना पुषपगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच, आर्थिक सल्लागार म्हणून समाजाला दिशा देणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्सचाही भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सी.ए. आशिष मोदी, सी.ए. आनंद सुरेखा व सी.ए.जयेश बजाज यांचा सत्कार करण्यात आला .देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासात त्यांचे मोठे योगदान असते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्र शेतकरी दिनानिमित्त परिसरातील कष्टकरी शेतकऱ्यांचा सत्कार. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्याला अन्न मिळते, याची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. श्री दिपक पारखेडे यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष एमजेफ लाॅ आकाश अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. निशांत मुखिया , कोषाध्यक्ष लॉ. सी ए आशिष मोदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.


Post a Comment