खामगाव आगारातून पिंपळगाव राजा व माटरगाव बस सेवा पूर्ववत सुरू करा: खामगाव शहर काँग्रेस कमिटीची मागणी आगार प्रमुखांना निवेदन


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खामगाव आगारातून पिंपळगाव राजा व माटरगाव बस सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी खामगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात 17 जुलै रोजी खामगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.


निवेदनामध्ये नमूद आहे की, खामगांव तालुक्यात पिंपळगाव राजा व माटरगाव ही मोठी गावे असून या ठिकाणावरून दररोज गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार बांधवांचे शेकडो मुले दररोज शालेय शिक्षण घेण्यासाठी खामगांव येथे येतात. या विद्यार्थ्यांना खामगाव येथे येण्या जाण्याकरिता मुख्य साधन बस सेवाच आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून पिंपळगाव राजा मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्याने ही बस सेवा पूर्णतः बंद होऊन विस्कळीत झालेली आहे. याकारणास्तव विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून खाजगी वाहनाने प्रवास करून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खामगाव येथील आपले शालेय शिक्षण नियमित करता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


तरी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पिंपळगाव राजा व माटरगाव येथून खामगाव पर्यंत पर्यायी मार्गाने बस सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आगार व्यवस्थापक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जो पर्यंत रेडी टू ड्राईव्ह असल्याचे कम्युनिकेशन मिळत नाही तोपर्यंत बस सेवा सुरु करता येत नसल्याचे सांगितले. यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या सोबत चर्चा केली व त्यांनी लगेचच अमरावती येथील नॅशनल हायवे ऑफिस सोबत संपर्क करून सदर रस्ता रेडी टू ड्राईव्ह असल्याचे कम्युनिकेशन आगार प्रमुखांना देण्याबाबत सूचित केले. त्यामुळे लवकरच ही बस सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.


यावेळी निवेदन देताना निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय देशमुख, खामगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, जुलकर नैन शेख चांद, खामगाव शहर अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, कैलास साबे, ज्ञानेश्वर शेजोळे, मंगेश भारसाकळे, अनंता ताठे, मयुर हुरसाड, प्रमोद चिंचोळकार, अक्षय शंकरवार, गिरीश देशमुख, सौरभ रिछारिया, शेख अब्दुल, म. इरफान म. इझरार, गोवर्धन ताठे, सय्यद जाफर, सचिन जैस्वाल, शेख इरफान शेख मोहम्मद, दीनानाथ पांडे, सोमेश भोयर, प्रणव जोशी, विलास नवसागर, पंकज घोगले, अनिल ठाकरे, अजय कंकाळे, प्रमोद हिंगणे, अजय पवार, चंद्रकांत मुंडीवाले, विशाल कवटेकर, मो. मुजाद्दीन, शेख इब्राहीम चौधरी, इब्राहीम खान यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم