पहिल्याच प्रयत्नात CA झाल्याचा मान! खामगावच्या विधी नीलेश खेतान यांचा यशस्वी प्रवास



खामगाव : जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर खामगावच्या विधी नीलेश खेतान हिने चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही अतिशय कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.


विधीने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण सरस्वती विद्यालय, खामगाव येथे पूर्ण केले. अत्यंत साधारण आर्थिक परिस्थिती असतानाही तिने दिवसाला 10 ते 12 तास नियमित अभ्यास करत ही मोठी कामगिरी साधली आहे.लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या विधीने शाळेपासूनच मेहनतीची सवय लावली होती. ती सरस्वती विद्यालयातून दहावीला शाळेतील पहिली आली होती.

आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आई-वडीलांना आणि अकोल्याच्या नीरज राठी सर तसेच सातत्यपूर्ण मेहनतीला देते.खामगावसारख्या छोट्या शहरातून येऊन CA सारखी परीक्षा पहिल्याच अ‍ॅटेम्प्टमध्ये पास करून विधीने अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post