खामगाव शहरात 100 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : 29 मंडळ होणार मिरवणुकीत सहभागी : आज लकी ड्रॉ
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क शहरात एकूण १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. प्रत्यक्षात पोलीस स्टेशनकडून परवानगी घेणाऱ्या गणेश मंडळांची संख्याही ९७ आहे. यामध्ये खामगाव शहर पोस्टेच्या हद्दीत ४२ तर शिवाजी नगर पोस्टेच्या हद्दीत ५५ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश आहे. तर विसर्जन मिरवणुकीमध्ये मात्र २९ गणेश मंडळ सहभागी असतात.
![]() |
| जाहिरात |
या मंडळांचा दरवर्षी मिरवणुकीतील क्रम ठरविण्याचा ड्रॉ काढल्या जातो. काही मंडळांचा मिरवणूक मार्गात अखेरचा नंबर असल्यामुळे अशा मंडळांची नाराजी असते. त्यामुळेच यंदा गणेश स्थापनेच्या दिवशी आगमन सोहळा म्हणून अनेक मंडळांनी अत्यंत जल्लोषात मिरवणूक काढली. यामधून आपल्या गणेश मुर्तीचे दर्शन शहर वासिंयाना स्थापनेच्या मिरवणुकीच्या माध्यमातून करून दिल्याचे दिसून आले. आज विसर्जन मिरवणुकी बाबत लकी ड्रॉ आहे ड्रॉ नुसार क्रमवारी ठरणार आहे.


إرسال تعليق