जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाला गालबोट, शेतकऱ्याने पूर्णा नदीत घेतली जलसमाधी? :  जिगाव प्रकल्पाच्या रस्त्यासाठी करण्यात आले आंदोलन 

जळगाव जामोद : स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यात गालबोट लागले असून जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला बहुतांश शेतकऱ्याला अजून मिळाला नाही त्याच धर्तीवर रस्ता मागणीसाठी आज 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने  नदीत उडी घेतल्या की खळबळ जनक घटना जिगाव प्रकल्प येथे उघडकीस आली आहे. वृत्तलेपर्यंत शोध मोहीम सुरू होते



         जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. जिगाव प्रकल्पांमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेती धरणात गेलेल्या असून अद्याप पर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला तसेच रस्ताही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला या  पूर्वी जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता. दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये  असलेला रस्ता यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आढळ गावाजवळ पूर्णा नदी पात्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलनामध्ये गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार याने पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली. यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले. बराच वेळ ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीने महसूल विभागाच्या एनडीआरएफ टीमला पाचारण आल्याची माहिती मिळाली आहे



Post a Comment

أحدث أقدم