नांदुरा वकील संघाची नवी कार्यकारिणी जाहीर
सुनिल जांगळे अध्यक्ष तर सचिव पदी देशमुख यांची निवड
नांदुरा (जनोपचार न्यूज नेटवर्क) –नांदुरा वकील संघाची सन 2025-26 ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीत तरुण नेतृत्वाबरोबरच ज्येष्ठांचा अनुभव अशा सुंदर संगमाने संघ अधिक सक्षम होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी वकील संघ नांदुराच्या कार्यालयात झालेल्या भव्य बैठकीत सर्व मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत एकमताने ॲड. श्री सुनिल के. जांगळे यांची नांदुरा वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच ज्येष्ठ सदस्य ॲड. श्री सदानंद ब्राह्मणे आणि ॲड. श्री राहुल मापारी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. ॲड. श्रीकांत देशमुख यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली असून ॲड. सागर पी. जैन यांची कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महिला प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ॲड. रागिणी केदारे मॅडम सहसचिव पदावर तर ॲड. सुनिल डी. इंगळे सहकोषाध्यक्ष पदी निवडून आले आहेत.
नूतन कार्यकारिणीमध्ये ॲड. श्रीराम डी. गावंडे, ॲड. एम. ए. राऊत, ॲड. आसिफ ए. खान, ॲड. नीता खंडारे मॅडम, ॲड. संदेश डी. इंगळे, ॲड. जी. टी. व्यवहारे व ॲड. सागर राठी यांचा कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.



إرسال تعليق