Advt.


राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेत नवे नेतृत्व ...

 अकोला विभाग कार्याध्यक्ष पदी एन आर काकड व बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी अनिल लोखंडे यांची निवड

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क - राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. चव्हाण आणि राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघटनेच्या महत्त्वाच्या पदांवर नव्या जबाबदाऱ्यांची धुरा स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अकोला विभाग कार्याध्यक्षपदी एन. आर. काकड (मेजर) तर बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी अनिल लोखंडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. या निवडीचे जिल्ह्यात आणि विभागात उत्स्फूर्त स्वागत होत असून, दोन्ही पदाधिकारी हे संघटनेच्या कार्याचा दीर्घ अनुभव, सेवाभाव आणि नेतृत्वगुण यासाठी ओळखले जातात.

नव्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचारी वर्गाच्या न्याय मागण्या, सेवा हक्कांचे संरक्षण, तसेच संघटनेचे संघटन बळकट करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील असा विश्वास नवनियुक्त दोन्ही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.सदर निवड प्रक्रिया ही राज्य संघटक राहुल डहाके, विभागीय पदाधिकारी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडली असून यावेळी विजय गोसावी, कडूबा सनांन्से, गजानन मारोडे, अनंता सपकाळ, सुनील कस्तुरे, संजय रिंढे, सुभाष हटकर, संजय मिसाळ, लक्ष्मण मलवार, संजय सातव यांच्यासह अनेक पदाधिकारी व संघटना सदस्य उपस्थित होते.

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم