प्रति महाकाल उज्जैन: बोरी आडगाव
शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह शिवसैनिकांनी केली श्रावणात महाकाल पूजा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : महाकाल उज्जैन प्रमाणेच तालुक्यातील बोरी आडगाव हुबेहूब रोज महिनाभर उज्जैन इंदोर येथील पुजारी यांच्या हस्ते रोज महापूजा व महाआरती श्रावणमाच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे बोरी आडगाव येथे शिव महाराज पाटील इंदोर,पिंटू पाटील,दत्ता पाटील,सरपंच गुलाबराव पाटील व गावकरी यांच्यावतीने भव्य दिव्य असा श्रावण मास महिनाभर उत्साहात पार पडतो त्यामध्ये दर सोमवारी महाप्रसाद रोज भव्य गावकऱ्यांचे सहभागातून रात्री ७ वाजता भव्य महाआरती तिसऱ्या सोमवारी शहापूर ते बोरी आडगाव महिला व पुरुषांची कावड यात्रा व पिंटू पाटील यांच्या वतीने तिसऱ्या सोमवारी महापंगत व चौथ्या सोमवारी भव्य असा कीर्तन सोहळा व पंचकोशीतील हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण असते.मागील वर्षी एक लाखाच्या वरती पंडित जी मिश्रा यांनी पूजन करून दिलेले रुद्र अभिषेक यांचे वाटप करण्यात आलेले होते.
बोरी आडगाव सरपंच गुलाबराव पाटील तसेच पिंटू पाटील यांनी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांना महाआरती करिता बोलावले असता उपस्थित राहून मनोभावे दर्शन करून भक्ती भाव वातावरणात आरती केली.यावेळी उपस्थित शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख अमोल पाटील,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना विभाग प्रमुख नामदेवराव टाले, मंगेश पाटील टीकार, शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,विभाग प्रमुख प्रभु घोंगे,विभाग प्रमुख प्रदीप बघे,सोशल मीडिया उपतालुका प्रमुख नरेंद्र गावडे,निखिल इंगळे, आदित्य सोनोने यांच्यासह भाविक भक्त महिला पुरुष युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

إرسال تعليق