ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार प्रदान 

बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क : दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना आज बुलढाणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

आज रविवार दिनांक २४ऑगस्ट २०२५ रोजी बुलढाणा येथील ओंकर लॉन्स येथे केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव, बुलढाणाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, डॉ शशिकांत खेडेकर, कार्यक्रमाचे आयोजक विजय अंभोरे आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेश राजोर यांच्यासह जिल्ह्यातील सात साहित्यिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सत्काराचा व्हिडिओ 👇👇




Post a Comment

Previous Post Next Post