महसूल सप्ताह २०२५ खामगाव तालुक्यात उत्साहात संपन्न
५५२२ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ :महसूल विभागाच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
*खामगाव, ता.* ८ : (उमाका) शासन निर्देशानुसार खामगाव तहसिल कार्यालयात दिनांक १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह २०२५ उत्साहात व यशस्विरीत्या संपन्न झाला. या आठवड्यात महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ ५५२२ लाभार्थ्यांना देण्यात आला.
सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिना’ने झाली. यावेळी महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.२ ऑगस्ट रोजी शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीपासून शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात आले. ३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील पाणंद व शिवरस्त्यांवर मोजणी करून दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.४ ऑगस्टला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ मंडळनिहाय राबवण्यात आले.५ ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन अनुदान देण्यात आले.६ ऑगस्ट रोजी अतिक्रमणमुक्ती मोहिम राबवून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले.७ ऑगस्ट रोजी ‘एम-सॅण्ड धोरण’ लागू करून सांगता समारंभ पार पडला.महसूल सप्ताहात “महाराजस्व शिबिरां”द्वारे विविध योजनांचे लाभ देण्यात आले. ‘जिवंत ७/१२’ मोहिमेतून शेतकऱ्यांना ७/१२ उतारे वाटप करण्यात आले. सेतू विभागामार्फत ६७८ विविध दाखल्यांचे वितरणही करण्यात आले.या वेळी बोलताना तहसिलदार. सुनिल पाटील म्हणाले, “महसूल सप्ताहाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या योजना आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे होय. अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्तरावरील प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे उपक्रम यशस्वी झाला.”नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभल्याने महसूल विभागाने पुढील काळातही असे उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली आहे.

إرسال تعليق