कार्यालयीन वेळेत खामगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला दिसले कुलूप!

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : कार्यालयाच्या निर्धारित वेळेतही कर्मचारी व अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून "गायब" झाल्याचे चित्र आज खामगाव येथील दारूबंदी विभागाच्या द्वारापाशी पाहायला मिळाले.

खामगाव येथील बियर बार, बिअर शॉपी, दारूची दुकानं यांच्यावर नियंत्रण व वेळेवेळी तपासनी व निर्धारित वेळेवर सुरू होते किंवा बंद होते यावर अंकुश ठेवणारे महत्त्वाचे विभाग म्हणजे राज्यशुल्क उत्पादन विभाग आहे. मात्र याच कार्यालयाला आज दुपारी कुलूप दिसून आल्याने चर्चा सुरू झाली आहे. या कुलूपाच्या निमित्ताने खामगाव शहरातील बहुतांश दुकाने वेळेच्या आधीच उघडतात तसेच बहुतांश बिअर शॉपी मध्ये नियमबाह्य बैठक व्यवस्था असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. खामगाव येथील राज्यशुल्क विभागाचे अधिकारी याकडे मात्र डोळेझाक करीत असल्याचे बोलल्या जाते.

Post a Comment

أحدث أقدم