रक्षाबंधन:ब्रह्मकुमारी दीदींनी पोलिसांना बांधल्या राख्या
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानीय ब्रह्माकुमारी सेवा केंद्र खामगावच्या वतीने शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी घेण्यात आला. या वेळी पोलीस बांधवांना रक्षाबंधनचे महत्व सांगताना सुषमा दीदी म्हणाल्या की, रक्षाबंधन हा निस्वार्थ प्रेम, एकता, पवित्रता व परिवर्तन याची साक्ष देणारा भारतातील मोठा उत्सव आहे.
![]() |
पैसे नव्हे विकाराचे दान द्या...
राखी बांधत असताना अनेक पोलिसांनी एक भेट म्हणून पैसे देण्याचे प्रयत्न केले. तेव्हा 'आपण कोणत्यातरी व्यसनाचा त्याग किंवा विकारांचा त्याग करावा, तेच दान आम्हाला हवे आहे', असे सांगत पैशाची भेट नाकारली. उलट मिठाई देऊन व सुविचाराचे छोटे संदेश कार्ड देऊन सर्वांचे आभार मानले. |
बहिणीने भावाला रक्षासूत्र बांधून पवित्र नात्याला व विश्वासाला जोपासण्याचे अभिवचन दिले जाते. आत्मा चे अर्थात आत्मिक स्वरूपाने विचार केल्यास सर्व मनुष्य एकाच ईश्वराची मुलं आहेत, त्यामुळे ही राखी अध्यात्मान घातलेलं एक बंधन आहे. ह्या बंधनात आपण आपल्याला बांधून घेऊन श्रेष्ठ कर्म करून रक्षा करू शकतो. या निमित्ताने ब्रम्हकुमारीज च्या वतीने संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात येणाऱ्या नशा मुक्त अभियानची माहिती त्यांनी दिली व सर्व पोलीस बांधवांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली तदनंतर ठाणेदार रामकृष्ण पवार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, नितेश मानकर, हरजितसिंग जाट उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये बीके दिव्या दीदी, उमा पंजवानी, आरती बुलाणी, किशोर भुतकर, सागर वाघ हे ब्रह्माकुमारी परिवारातील सदस्य यांनी सहभाग घेतला.






إرسال تعليق