हर हर महादेव जय शिवशंभो....
सतीफुल भागातील कावड झाली मित्र मंडळ चांगदेव मुक्ताई कडे रवाना
खामगाव न्यूज नेटवर्क : अँड अमोल अंधारे व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचे उपस्थितीत मध्ये नामवंत असलेल्या सति फैल भागातील कावळधारी मित्र मंडळ चांगदेव मुक्ताबाईकडे पवित्र जल आणण्याकरिता रवाना झाले.
श्रावण मासानिमित्त पवित्र असलेल्या अशा चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी कावड धारी चांगदेव मुक्ताबाईकडे रवाना होण्याच्या पूर्वी सति फैल भागातील हनुमान मंदिरामध्ये हिंदू सेवक अँड अमोल अंधारे व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे यांच्या हस्ते मनोभावे आरती करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भोले भक्त हर हर महादेव जय शिवशंभो देवाधिदेव महादेवाचे गजरात मुक्ताबाईकडे रवाना झाले. असून शनिवारी रात्रीच पवित्र कावड घेऊन १००/१२० किलोमीटरचा प्रवास करत युवा भोले भक्त पैदल चालत पायामध्ये कुठलेही चप्पल न घालता पाई चालत येणार आहेत.
शनिवारी दुपारी खामगाव इथून निघालेले कावडधारी शनिवारी रात्रीच भोले भक्त चांगदेव मुक्ताबाई इथून पवित्र जल घेऊन रात्रीच निघालेले आहेत व सोमवार सकाळपर्यंत खामगाव येथे पोहोचणार आहेत व खामगाव शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भोलेनाथांना अभिषेक करत पवित्र जल अर्पण करणार आहेत या निमित्त खामगाव शहरांमध्ये भव्य अशा पंचवीस तीस शोभयात्र सुद्धा निघणार आहे.
परंतु नामवंत असलेल्या सति फैल भागातील सर्व युवावर्ग असलेले कावळ यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त असते हे विशेष.यावेळी उपस्थित असलेले शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे,बजरंगी आशिश लांडगे,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,शुभम मुधोळकर,मुन्ना बोंद्रे,विक़्की घोडेचोर, जिक्य जाधव,उमेश तायडे,आकाश अंधारे,बंठी देशमुख,सुरज विभुते, अभिषेक तिवारी,विनोद ढवळे,आदर्श आनंदे,आकाश मोठे,अतुल गलवाडे,मनोज कुरील,सागर श्रिवास,नरेश लोंढे,गणेश तायडे,अभय रेठेकर,कनैया यादव,राहुल तायडे,आकाश पवार,करण मोठे,तब्बू तायडे,आनंद महाडिक,बोराखडे,पवन पवार,मा.सरपंच जनार्दन मोरे,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, शिवसेना विभाग प्रमुख आकाश माने,प्रविन पोरे,सोशल मीडिया उप तालुका प्रमुख नरेंद्र गावंडे,आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.



Post a Comment