डॉ. मानकर यांनी बनविलेल्या डिव्हाईसला भारत सरकारचे पेटेंट
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- वैद्यकीय क्षेत्रात नवनविन शोध लावल्या जात आहे. जेणेकरुन आरोग्य सुविधा चांगल्या पध्दतीने मिळू शकतील. यामधूनच येथील दंतरोगतंज्ञ डॉ. सम्राट मानकर यांच्यासह १० डॉक्टरांच्या चमूने बनविलेल्या डिव्हाईसला भारत सरकार पेटेंट कार्यालयाने पेटेंट देवून प्रमाणीत केले आहे
![]() |
| Advt. |
या पेटेंटचा उपयोग दंतचिकित्सेसाठी होणार आहे. त्यामुळे दातांवरील उपचार करणे भविष्यात अत्यंत सोपे होणार आहे. एवढेच नव्हे तर नविन दात बनवितांना द्यावे लागणारे माप घेणे या डिव्हाईसच्या मदतीने सोपे झाले आहे. या डिव्हाईसच्या संशोधनाचे हे कार्य दहा डॉक्टरांच्या चमुने २०१९ मध्ये सुरु केले होते. तर २०२१ मध्ये 'स्मार्ट मेडीकेशन डिस्सपेन्सर आणि रिमाईंडर या नावाने डिव्हाईस तयार करण्यात आले. सदर डिव्हाईसला २०२५ मध्ये पेटेंट मिळाले. त्यामुळे या संशोधन कार्याच्या गौरवामुळे वैद्यकीय क्षेत्रात डॉ. सम्राट मानकर व चमुचे नाव या डिव्हाईससाठी आता प्रामुख्याने घेतल्या जाणार आहे.


Post a Comment