काँग्रेस कडून सद्भावना दिवस व शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
खामगाव जनोपचार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.
![]() |
| Advt. |
सर्वप्रथम सुटाळा येथील पंचक्रोशितील प्रसिध्द श्री महादेव मंदिर येथे शिवपिंडीला जलाभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सावजी लेआऊट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सकाळी १० वाजता ठाकरे हॉस्पिटल मद्ये सोनी पॅथालॉजी व ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी असंख्य युवकांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉ. निखिल ठाकरे व डॉ.गोपाल सोनी यांच्यासह त्यांच्या चमुने परिश्रम घेतले. शिबिरानंतर दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता सामान्य रूग्णालयात स्वप्निल ठाकरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गरजुंना अन्नदान करण्यात आले.
यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, शहर कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



إرسال تعليق