लॉयन्स क्लब खामगाव संस्कृती द्वारे शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांचा सत्कार आणि साजरा केला रक्षाबंधन उत्सव
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क : लॉयन्स क्लब संस्कृतीने खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'सम्मानित का सम्मान' आणि 'रक्षाबंधन' या दोन कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. पोलीस स्टेशनमध्ये आयोजित या अनोख्या कार्यक्रमात लॉयन्स क्लबने शहर पोलिसांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार, श्री रामकृष्णजी पवार साहेब यांना नुकतेच 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाल्याबद्दल लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव परिवारातर्फे त्यांचे विशेष अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांच्या अतुलनीय सेवेबद्दल हा सन्मान मिळाल्यामुळे, क्लबने त्यांचा गौरव करण्यासाठी हे खास समारंभ आयोजित केले.
![]() |
| जाहिरात |
या सत्कार समारंभासोबतच, क्लबच्या महिला सदस्यांनी राखी पौर्णिमेचा पवित्र सणही साजरा केला. त्यांनी खामगाव पोलीस स्टेशनमधील तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी आणि नागरिकांमध्ये एक आपुलकीचे नाते निर्माण झाले.
हा अविस्मरणीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरपर्सन लॉ भारती गोयनका, लॉ कविता अग्रवाल, आणि लॉ खुशबू अग्रवाल यांनी विशेष पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला लॉयन्स क्लबचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व इतर सदस्य उपस्थित होते. लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयंका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.


Post a Comment