१०० दिवस विशेष सुधार मोहिमेत अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांचा नव संकल्प फाउंडेशन च्या वतीने सत्कार
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेनंतर १०० दिवसांचा विशेष कृती आराखडा सर्व शासकीय कार्यालयांसाठी लागू केला होता. या मोहिमेत खामगाव नगरपरिषदेने अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला. याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांचा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नव संकल्प फाउंडेशनच्या वतीने डॉ.प्रशांत शेळके यांचे गुलाबाचे वृक्ष भेट देऊन स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.
नगरपरिषदेने स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त कार्यालय निर्माण केले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील १२,००० शासकीय कार्यालयांनी यशस्वीपणे सहभाग घेतला. खामगाव नगरपरिषदेने विविध विकासकामे केली, ज्यात दोन स्वतंत्र अभ्यागत कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष, जन्म-मृत्यू विभागात नवीन कपाटे, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, आणि आकर्षक ऐतिहासिक छायाचित्रांचा समावेश आहे. प्रत्येक विभागाचे कामकाज पारदर्शक ठेवण्यासाठी लेखाजोखा फलक लावण्यात आले. यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना गतिमानपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.डॉ. प्रशांत शेळके आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक आहे.
यावेळी फाउंडेशन चे आकांशा घेवंदे, शारदा इंगळे,प्रतीक्षा मोरे,सुचिता लोखंडे, पायल बरदीया, पायल हेलोडे, दिव्या पाटोकार,प्रियांका इंगळे,प्रणाली हेलोडे,रुपाली पोळके,आनंद लोखंडे, यश पैठणकर,अमर गवई,अमर जाधव,संतोष साळुंके व बंटी गव्हांदे उपस्थित होते.



إرسال تعليق