खामगाव तालुक्यातील शहापूर येथे शिवसेनेचा कार्यकर्ते मेळावा उत्साहात

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव  यांच्या आदेशावरून खामगाव तालुक्यातील शहापूर येथे अटाळी जिल्हा परिषद सर्कलचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यामध्ये महिला, पुरुष,युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.शिवसेना सदैव सेवेसाठी रात्री केव्हा पण नेहमीच तत्पर असतेच त्यामध्ये गाव पातळीवरील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन नेहमी केंद्रीय मंत्री महोदयाच्या सहकार्यातून प्रयत्न करतात.

तसेच शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार बुलढाणा जिल्हा संघटक मा.श्री.संजय जी गायकवाड यांच्या सूचनेनुसार शिवसेना सदस्य नोंदणी करणे नवीन शाखा गठीत करणे,नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्हा खामगाव तालुक्यात गावा गावात अभियान सुरू असताना प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये एक जिल्हा परिषद सर्कलचा मेळावा घेण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहापूर पळशी अटाळी एक जिल्हा परिषद सर्कलचा मेळावा संपन्न झाला.

जाहिरात

तसेच येत्या काही दिवसात तालुक्यातील संपूर्ण गाव तिथे शाखा घेण्याचा मानस आहे.त्यापैकी ८० टक्के शाखा खामगाव तालुक्यात गठीत सुद्धा झालेले आहेत.तसेच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.आपल्याला जातीपातीच्या पलीकडे  जाऊन फक्त काम करण्याची आवड आहे.कोणाचाही फोन आला तर आपण त्याला कधीच त्याचं गाव,नाव,जात,पात,पंत,धर्म विचारत नाही फक्त आपले काय काम आहे हेच विचारतो आणि ते करतो सुद्धा माझ्यासोबत रोज सोबत असणारे जिगरी कार्यकर्ते आहेत पाच समाज चे पाच आहेत त्यामध्ये एक बुद्धिस्ट बांधव प्रकाश हिवराळे,मुस्लिम बांधव शेख समीर,आदिवासी बांधव गोपाल चव्हाण,ओबीसी सागर मेतकर,संतोष दुतोंडे,NTओबीसी लक्ष्मण काकडे,असे रोज सोबत असणारी कार्यकर्ते आहेत.

जाहिरात

आपल्याला बनवताना सर्व धर्मीय भगवंताने सर्वांना एक सारखे रक्त दिलं ते पण सर्वांचं लालच रक्त आहे सर्वांच सारखच आहे.मग आपण कशाला जातीपाती मध्ये भेदभाव करून एकमेकांचे डोके फोडतो प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल,राष्ट्रा बद्दल,जाती बद्दल धर्माबद्दल गर्व असलच पाहिजे परंतु कोणाचे भावना दुखवतील इथपर्यंत सुद्धा नसावं,स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर सुद्धा आपण जातिपातीमध्ये गुंतलो आहे हे आज शोकांतिका आहे.माझी आपणा सर्वांना विनंती आहे.जाती पलीकडे जाऊन आपण एकजूट होऊन अन्याय विरुद्ध लढलो पाहिजे.विशेष म्हणजे शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सामाजिक कार्यकर्ते सोपान देवराव वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून फक्त एका दिवसाचे नियोजनामध्ये हजाराच्या वरती कार्यकर्ते उपस्थित होते. 

तसेच ह.भ.प श्रीकृष्ण महाराज सुरळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर छोटे खानी व्याख्यान केले.

 अटाळी पळशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये ११ तारीख लाखनवाडा सर्कलमध्ये 12 तारीख ठेवण्यात आलेली आहे. निशुल्क आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सुद्धा आव्हान करण्यात आले.आरोग्य शिबिरामध्ये सर्व आजारावर उपचार होणार आहे ऑपरेशनची आवश्यकता पडल्यास ते सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.सर्व उपचार निशुल्क असणार आहेत.तसेच शिवसेना आपल्या दारी अभियानातून पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक सौ.सरस्वती ताई बदर्खे होत्या, यावेळी मंचावर उपस्थित हिंदू नेते अँड अमोल अंधारे,शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश भाऊ वावगे,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शारदाताई पाटील,शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,श्वेता ताई पाटील,दिपाली ताई अडकणे,सविता ताई करडेल,गजानन तिडके सर, गावातील ज्येष्ठ नागरिक,बबन गुरुजी टाले, डॉक्टर रतन राठी सर,प्रमोद गुरुजी टाले,शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल भिल,किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर भाऊ मेतकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,उपतालुकाप्रमुख प्रवीण पाटील धामोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,विभाग प्रमुख विलास बापू देशमुख,उपतालुकाप्रमुख शिवशंकर सरोदे,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, सोशल मीडिया उप तालुकाप्रमुख सुरज ढोले,विभाग प्रमुख चेतन भाऊ शेलकर,विभाग प्रमुख मारुती भाऊ जगताप, विभाग प्रमुख प्रभाकर बघे, विभाग प्रमुख नामदेव टाले, विभाग प्रमुख विजय भगत, विभाग प्रमुख प्रभू घोंगे, विभाग प्रमुख प्रदीप बघे, शिवसेना तालुका प्रसिद्ध प्रमुख भूषण दुतोंडे,विभाग प्रमुख रुपेश तायडे,आदी सह शहापूर गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

أحدث أقدم