खामगाव मध्ये एक शाम किशोर कुमार के नाम गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम
मेलोडी सिंगर स्वर्गीय किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त खामगावात एक शाम किशोर दा के नाम. असा कराओके गायनाचा कार्यक्रम 10 ऑगस्ट रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रोत्यांसाठी अगदी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.खामगाव तसेच परिसरातील मराठी, हिंदी गाण्यांची आवड असलेल्या सर्व संगीत प्रेमींनी आवर्जून हजर रहावे. गेल्या 3 वर्षापासून कराओके सिंगर्स क्लब खामगाव यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील रसिक, श्रोत्यांसाठी एक संगीताची मेजवानी ठरते.यावर्षी 10 ऑगस्ट रविवार रोजी आसरा चौपाटी हॉल, नांदुरा रोड, खामगाव येथे ही सुरेल मैफिल जमणार आहे .त्यासाठी अधिक माहिती साठी 94 23 56 56 48., 98 22 13 33 17.,9850 0829 34.,86 00 31 5055या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवावी. आपल्या सर्वांच्या उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Post a Comment