जिगाव प्रकल्पातील भ्रष्टाचाराने घेतला शेतकऱ्याचा बळी - लोखंडकार

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : जिगाव प्रकल्प हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रकल्प असायला हवा होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचार, निधीची अफरातफर आणि विलंबामुळे प्रकल्प अपूर्ण राहिला आहे. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे – प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही.याच अन्यायाविरोधात आवाज उठवताना स्व. विनोद पवार यांनी, आपल्याला स्वतःच्या शेतजमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे तीव्र संतापाने जलसमाधी घेत आत्महत्या केली. ३० तासांनंतर त्यांचे पार्थिव धुपेश्वर येथे सापडले.ही घटना म्हणजे जिगाव प्रकल्पातील भ्रष्टाचाराने घेतलेला शेतकऱ्याचा थेट बळी आहे.

शेतकरी नेते बच्चूभाऊ यांचा पुढाकार शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत शेतकरी नेत व माजी मंत्री बच्चूभाऊ कडू स्व. विनोद पवार यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. तसेच या प्रकरणाला न्याय मिळवण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार असून, लढ्याला अधिक तीव्रता मिळणार आहे.


जिगाव प्रकल्पातील भ्रष्टाचार, निधी गैरवापर आणि मोबदला न दिलेल्या प्रकरणांची स्वतंत्र SIT चौकशी. व्हावी.स्व. विनोद पवार यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, योग्य मोबदला आणि कायमस्वरूपी आधार देण्यात यावा.स्व. विनोद पवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. ज्याने आपल्या शेतीसाठी न्याय मागितला, त्यालाच मोबदला नाकारला – हा अत्याचार आहे. प्रकल्प केवळ कागदावर किंवा भ्रष्ट लोकांच्या खिशात राहणार नाही. शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचेपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही.ही जनतेची लढाई आहे आणि ती शेवटच्या थेंबापर्यंत लढली जाईल.” असा इशाराही लोखंडकाऱ्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post