भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाड्यास प्रारंभ : शहरात राबविले स्वच्छता अभियान

 खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- भाजपाच्या वतीने आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यास  स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. अँड. आकाश फुंडकर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून पंधरा दिवस खामगाव मतदार संघात विविध सामाजिक सेवा कार्यक्रम प्रत्येक बूथस्तरावर राबविण्यात येणार आहेत. 

जाहिरात

आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून या सेवा पंधरवाड्यास स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शहरातील उपजिल्हा न्यायालय परिसर त्यानंतर फरशी व छत्रपती शिवाजी महाराज वेस या परिसरात प्रथम टप्प्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेषता येत्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जगदंबा माता संस्थान घाटपुरी या मार्गाने जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. 

आजच्या स्वच्छता अभियानात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पुरोहित, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, सौ अनिताताई देशपांडे, माजी नगरसेवक विलास देशमुख, सौं जान्हवी कुलकर्णी, सौं शिवानी कुलकर्णी, सौं भाग्यश्री मानकर, सौं पूजा वऱ्हाडे, विजय उगले, जितेंद्र पुरोहित, जसवंत सिंग शिख, शुभम देशमुख आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आज पासून ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत भाजपाच्या वतीने विविध समाजपयोगी कार्यक्रम या अभियानाच्या माध्यमातून पार पडणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post