सीपी राधाकृष्णन भारताचे 17 वे उपराष्ट्रपती: बुलढाणा जिल्ह्यातील आठवणी झाल्या ताज्या
जनोपचार ब्युरो : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया पार पडली.
महाराष्ट्राचे राज्यपाल असताना बुलढाणा जिल्हा दौऱ्यात बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दैनिक देशोन्नती चे बुलढाणा जिल्हा आवृत्ती संपादक तथा जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांच्यासह निवडक पाच पत्रकारांशी चर्चा सत्र करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांना प्रत्यक्ष सुमारे एक तास भेटीचा योग आला. आणि त्यामधून त्यांना लक्षात आले की सीपी राधाकृष्णन हे मराठी बोलत नाही, हिंदी पण कमी बोलतात मात्र इंग्रजीत व्यवस्थित मात्र निवडक संवाद करत असले तरी ते खूप छान ऐकणारे व्यक्तिमत्व आहे.
सतीशआप्पाजी दुडे, मुन्ना पुरवार यांची ग्रेट भेट!
सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना, नागपूर येथील राजभवनात सांग दैनिक प्रश्नकालचे व्यवस्थापक सतीश अप्पा दुडे व त्यांचे मित्रबंधू मुन्नाभाऊ पुरवार यांची ग्रेट भेट झाली. त्यावेळी टिपलेले हे छायाचित्र जिल्ह्यातील आठवणी ताज्या करतात.
![]() |
| तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन |




إرسال تعليق