ज्येष्ठ पत्रकार बळीराम वानखडे यांना प्रोत्साहनपर मिळाले 5 हजार 111
लोकोपचार च्या वतीने करण्यात आले सन्मानित
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क: साप्ताहिक समाज निष्ठाच्या माध्यमातून शहर व परिसरातील समस्यांना वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार बळीराम तोताराम वानखडे यांच्या व्हाट्सअप वरील निर्भीड बातम्यांची दखल घेत सांज दैनिक संपादक काका रुपारेल यांच्या वतीने प्रोत्साहनपर 511 रुपये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सांज दैनिक लोकोपचार कार्यालयात आज 26 सप्टेंबर 25 रोजी दुपारी एका छोटे खाणी कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष अविनाश घोडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ५१११ रोख बक्षीस देऊन बळीराम वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोरकाका रुपारेल, महेंद्र पाठक, नरेंद्र मावळे, ज्येष्ठ पत्रकार राजीव तोटे, पत्रकार शिवाजी भोसले, ऑपरेटर गजानन अहिर, कैलास सावरकर , शकील जमादार आदि उपस्थित होते.



Post a Comment