आहार विषयक जागरूकता आजारापासून दूर ठेवते - प्रा. डॉ.सौ.जया काळे

खामगाव - जनोपचार न्यूज नेनेटवर्क: सुदृढ शरीर ,शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम ह्या पाच गोष्टी मनुष्याला सुख प्राप्त करून देतात. यातील एका गोष्टीचा जरी अभाव असला तर सुख मिळणं दुरापास्त आहे. या सुखासाठी निसर्गाशी जुळूवून आपल्या जीवन शैलीत बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी आहार प्रणालीचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मौलिक मार्गदर्शन डॉक्टर जया काळे यांनी आज ब्रह्माकुमारी सेवा केंद्र रायगड कॉलनी येथे केले.  

          ब्रह्मकुमारीज खामगाव तसेच पंचवटी फॉर्म शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाच दिवसीय आरोग्य शिबिराचे उद्घाटन सोमवारी सकाळी झाले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदीजी, प्रमुख वक्ता डॉक्टर जया काळे, रिसोड सेवा केंद्र संचालिका ज्योती दीदी, अकोला सेवा केंद्र संचालिका वैशाली दीदी तसेच तप सेवा  सुमीरण चे वरिष्ठ सदस्य  श्री बकाल साहेब यांची उपस्थिती होती.  

          सर्वप्रथम ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छद्वारे स्वागत केले. सौ स्वाती गावंडे यांनी स्वागत गीत गायले.

         साधनामय  जीवनामध्ये शारीरिक स्वास्थ फार महत्त्वाचे आहे.  त्यामुळे ब्रह्माकुमारी संस्थेतील सर्व साधकांनी निसर्गाशी स्वतःला जोडून योग्य आहार पद्धतीचा अवलंब करून आपल्या जीवनामध्ये शारीरिक स्वास्थ प्राप्त करावे. आपल्या साधनेमध्ये सफल व्हावे, या शुभ भावनेतून सदर आरोग्य शिबिराचे  आयोजन करण्यात आले,असे आदरणीय शकुंतला दीदीजी यांनी आशीर्वाचनामध्ये सांगितले. 

        मान्यवरांचा शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचा शुभारंभ झाला. दीप प्रज्वलन साठी ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी डॉ जया काळे, श्री बकाल साहेब, वैशाली दीदी पूनम दीदी, श्रद्धा दीदी, ज्योती दीदी उज्वला दीदी ,वर्षा दीदी सुषमा दीदी यांची उपस्थिती होती. 

       प्राकृतिक आहार,प्राणायाम, व्यायाम, ध्यान या चार गोष्टीद्वारे संपूर्ण स्वास्थ प्राप्त करता येते, सर्व रोगांवर मात करता येते,  असा स्वतःचा अनुभव सांगून या पाच दिवशीय शिबिरामध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाईल, असे डॉक्टर जया काळे यांनी सांगितले. 

               कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वर्षा दीदी व आभार संचालिका राजयोग भवन  ब्रह्माकुमारी सेवा केंद्र अकोला यांनी केले. या शिबिरात सुमारे ५० लोक सहभागी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post