सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव येथे "अभियंता दिन" साजरा
अभियंता हा फक्त तंत्रज्ञानाचा जाणकार नसतो, तर तो समाजाचा शिल्पकार असतो– सागरदादा फुंडकर.
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगाव द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन हा मोठ्या उत्साहात महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर दादा फुंडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम राबविल्या जातात,या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे एवढेच ध्येय न ठेवता, नवकल्पना, संशोधन आणि समाजहितासाठी उपयोगी अशा संकल्पना विकसित करणे ही खरी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे ‘अभियंता दिन’ या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
![]() |
| जाहिरात |
त्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, प्रोग्राम डेव्हलपमेंट, सर्किट डिझाईन, ब्रिज मिना, थ्रीडी ड्रॉईंग, सिवि रायटिंग, ग्रुप डिस्कशन, इन हाऊस "हॅकाथोन" अशा विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी , तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे, अधिष्ठता प्रा. धीरज वानखडे, आणि विद्यार्थी प्रतिनिधी मधून प्रेसिडेंट ऑफ इंत्रेप्रेनरशीप अँड डेव्हलमेंट सेल वेदांत गव्हाणे, प्रेसिडेंट ऑफ इंनोवेशन अँड इंत्रेप्रेनरशिप काऊन्सिल यशवंत हिवरखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारताचे पहिले अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत कुलकर्णी आपल्या भाषणामध्ये संबोधन करीत अभियंता म्हणजे फक्त यंत्रे दुरुस्त करणारा नाही, तर तो समाजासाठी नवे मार्ग निर्माण करणारा, समस्या सोडवणारा आणि नवनवीन शोध लावणारा एक सर्जक असतो. पुल, धरणे, रस्ते, वीज, संगणक, इंटरनेट ते रोबोटिक्स—हे सर्व अभियंत्यांच्या कल्पकतेतून साकार झाले आहे. त्यानंतर तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांनी आपल्या भाषणामधून आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की आपण केवळ अभियंता न राहता, जबाबदार अभियंता व्हावे. राष्ट्राला गरज आहे अशा अभियंत्यांची जे प्रगतीबरोबरच शाश्वत विकासाची वाट दाखवतील. अशाप्रकारे सर्व अभियंताला या दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रा. श्रद्धा कडूकार , प्रा. निंबाळकर व सर्व टीम यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ फुंडकर आणि संस्थेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अँड. आकाश दादा फुंडकर यांनी कौतुक केले व सर्व अभियंत्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.


إرسال تعليق