खामगांव अर्बन बँकेच्या वतीने पर्यावरणपुरक गणेशमुर्ती, गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार व भाविकांना चहाचे वितरण

खामगांव अर्बन बैंक कर्मचारी दत्त उपासक गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तीपुर्ण वातावरणात पर्यावरणपुरक गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली होती व हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचे ७५० वे जन्मोत्सव वर्ष असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी आरतीनंतर विश्व कल्याणाकरीता सामुहीक पसायदान गायन करण्यात आले. तसेच अनंत चर्तुदशीच्या दिवशी खामगांव शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या सर्व मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सर्व गणेश भक्तांकरीता मोफत चहाचे वितरण स्थानीक अर्जुन जल मंदीर, सरकी लाईन खामगांव येथे संपन्न झाले.

सर्व प्रथम शहरातील मानाचे श्री लाकडी गणपतीस बँकेचे मा. अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे व प्रबंध संचालक ज्ञानेश्वरजी जाधव, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परागभाऊ देशमुख यांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले व चहा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. तदनंतर महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व श्री. तानाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष नामदार अॅड. आकाशदादा फुंडकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. रामकृष्ण पवार, बापुसाहेब करंदीकर तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधु यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे यांनी केला. त्यांनतर चौकात येणाऱ्या सर्व मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचा भगवा दुपट्टा व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सकाळी १० ते रात्री १२.०० वाजेपर्यन्त २१००० चे वर भाविकांना चहा वितरीत करण्यात आला. बँकेच्या चहा स्टॉलला शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देवून या सामाजीक उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमास बँकेचे संचालक संदीपजी डोळस, संचालिका सौ. मनिषाताई माटे, सी.ए. सौ. मिनाताई देशमुख, सहा. सरव्यवस्थापक दिपकजी धिवार, मुख्य व्यवस्थापक विवेक कुळकर्णी, शाखा व्यवस्थापक गिरीष देशपांडे, मोहन देशपांडे व प्रशासन अधिकारी देविदास उमाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन राजु जुनारे यांनी केले. यशस्वीतेकरीता खामगांव अर्बन बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم