गो. से. महाविद्यालयात नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनी उत्साहात संपन्न
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क): विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो.से विज्ञान,कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे ॲड.स्व.शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव - २०२५ या निमित्ताने महाविद्यालयाच्या इनोव्हेशन , इन्क्यूबेशन सेल द्वारे भौतिकशास्त्र विभागामध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी "Innovate 2025" या नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर प्रदर्शनाचे उद्घाटन विदर्भ शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य. डॉ. नंदकिशोर महल्ले यांनी केलं. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले. तसेच अँड. स्व. भाऊसाहेब बोबडे स्मृती सप्ताहाचे समन्वयक डॉ. देवेंद्र व्यास यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. उद्घाटन प्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय हरगुणानी, प्रा. अमित शिंदे, प्रा. अरविंद तायडे आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शनी मध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ऐकून 31 प्रकल्प प्रदर्शनी मध्ये सादर करण्यात आले. सर्व प्रकल्पांचे परीक्षण वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. जयंत पोरे व गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन शिंगणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक नागरिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले.

إرسال تعليق