उद्या 'गाना गाओ जिंदगी सजाओ' ,च्या वतीने हिंदी दिवस निमित्त विविध कार्यक्रम
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) : ईश्वरसिंह ठाकूर प्रस्तुत 'गाना गाओ जिंदगी सजाओ' फेसबुक लाइव्ह शो च्या वतीने राष्ट्रभाषा हिंदी दिवसाच्या गौरवानिमित्त उद्या १४ सप्टेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम नांदुरा रोड स्थित आसरा चौपाटी हॉल येथे दुपारी ३ ते रात्री १०वाजे दरम्यान होणार आहे.
यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विजयकुमार चौधरी, भूतपूर्व अध्यक्ष म. रा. अग्रवाल संमेलन, श्रीमती सरुताई सेवक सेवानिवृत्त शिक्षिका, कालिदास लाटा सेवानिवृत्त शिक्षक, सीताराम जाधव सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, सी.ए. रतन राठी, नवलकिशोर लोहिया सेवानिवृत्त प्राध्यापक, किशोर मिश्रा सेवानिवृत अभियंता व सुप्रसिद्ध कवी, हितेश सोनी सुप्रसिद्ध कवी, विनोद डीडवानिया प्रसिद्ध उद्योजक, विक्रांतसिंह राजपूत सुप्रसिद्ध युवा शाहीर यांचा सन्मान होणार आहे.
![]() |
| जाहिरात |
सन्मान सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी गाना गाओ जिंदगी सजाओ चेसदस्य च्या वतीने नवीन-जुनी हिंदी गाणी सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गाना गाओ जिंदगी सजाओ चे सदस्य प्रल्हाद शर्मा, विजय महर्षी, दिनेश गवई, दीपक परळकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन. ईश्वरसिंह ठाकूर, खामगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आहे.



Post a Comment