ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल मार्गदर्शक तथा राज्य संघटन प्रमुख , सागर मोदी विभागीय संघटनप्रमुख, प्रा.डवले राज्य मार्गदर्शक तर प्रा. मो. फारूक यांची  बुलढाणा संघटना प्रमुखपदावर नियुक्ती

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव-  नियमित उपक्रमांसह पत्रकार आणि सामाजिक कल्याणाची संघर्षशील वाटचालीने भरगच्च मासिक कार्यक्रमांच्या अर्धशतकात पोहचलेली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना ने आता वटवृक्षाकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुभवी पत्रकारांच्या सहभागाने  हे चित्र स्पष्ट होत आहे.असे महत्वपूर्ण वास्तव  विचार अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे यांनी व्यक्त केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४९ वा मासिक विचारमंथन मेळावा अकोल्यात जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.विविध क्षेत्रातील प्रभावशाली समाजसेवी व राज्यातील पत्रकारांचा वाढता ओघ हे त्याचेच द्योतक आहे असेही ते यावेळी म्हणाले.वाशिम येथील ज्येष्ठ सेवाव्रती व प्रख्यात व्यावसायिक गिरधारीलालजी सारडा,आय.एम‌.ए.चे अध्यक्ष,ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोगतज्ञ डॉ.रणजित देशमुख यावेळी प्रमुख अतिथी म्हणून,तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,विदर्भ संघटन प्रमुख संतोष धरमकर,जिल्हा कार्याध्यक्ष बुढन गाडेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अतिथींचे सन्मानचिन्ह,शाल पुष्पगुच्छांनी सत्कार करण्यात आले.अध्यक्ष संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून आगामी सर्व पत्रकारांना दसरा - दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतांना शेतकरी,श्रमिकांच्या वेदनांप्रती तिव्र संवेदना प्रगट करून शासनाकडून भरीव मदतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या.यावेळी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदन- अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, महिला,नैसर्गिक आपत्तीमधील व अपघाती बळी व दिवंगत पत्रकाकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली.याप्रसंगी गिरीधारीराल सारडा डॉ.रणजित देशमुख , सुमन गाडेकर ,आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विचारमंथन सभासदांना सन्मानपत्रं, पदाधिकारी नियुक्तीपत्रे व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.खामगाव येथील युवा दर्शन चे संपादकज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांची मार्गदर्शक तथा महाराष्ट्र संघटन प्रमुख तर वरिष्ठ पत्रकार सागर मोदी यांची विदर्भ संघटन प्रमुख,प्रा.मोहम्मद फारूक   यांची बुलढाणा जिल्हा संघटन प्रमुख तर अकोला येथील प्रा.प्रकाश डवले यांची राज्य मार्गदर्शक म्हणून नियुक्तीची घोषणा यावेळी अध्यक्ष संजय देशमुख यांनी केली. डॉ.गौरव राजाभाऊ देशमुख यांना आचार्य पदवीबध्दल सन्मानित करण्यात आले.यावेळी पुष्पराज गावंडे,बुढन गाडेकर व धरमकर यांनीही मनोगते व्यक्त केली.  संचालन प्रा.देवबाबू उर्फ महादेव लूले यानी  तर  आभारप्रदर्शन प्रा.मोहन काळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post