शिवांगी बेकर्स च्या कामगाराचे बुलढाण्यात उपोषण सुरू 

अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढा देऊ- विजय मांडवेकर

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - शिवांगी बेकर्स जानुना खामगाव मधील कामगारांनी आपल्या न्याय मागणीसाठी आजपासून बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची तयारी कामगार विजय मांडवेकर यांनी यावेळी जनोपचारशी बोलताना स्पष्ट केली. 

मिळालेल्या माहितीनुसार मांडवीकरांनी कंपनीकडून झालेल्या अन्याय विरोधात शासकीय कार्यालयाला पत्रामार्फत कळविले होते. यात त्यांनी नमूद केले होते की, माझ्यासोबत घडलेली अन्यायकारक घटना थोडक्यात अशी की मला विनाकारण कंपनीकडुन व्यवस्थापकाकडुन माझ्यावर तंबाखू बाळगण्याचे खोटे आरोप लावून मला कंपनीमध्ये येण्यास बंदी केली.

तरी सदर प्रकारची सखोल चौकशी होऊन माझ्यावर अन्याय करणारे, शिवांगी ब्रेकर्स खामगांव व्यवस्थापक, संचालक यांच्यावर कारवाई होणेसाठी व मला कंपनी पुन्हा रुजी  करणेबाबत पत्रात नमूद आहे. त्या अनुषंगाने आज मांडवेकरांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला इतर कामगारांचाही पाठिंबा मिळणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم