मेव्हण्याच्या आईचा खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ माने / गाडेकर यांचा निकाल
हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क :- प्लॉट घेण्याच्या मागणीसाठी सासरवाडीत धिंगाणा घालत मेहुण्याच्या आई ला बाजीच्या ठाव्याने मारहाण करून तिचा खून केल्या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ सरोज माने गाडेकर यांनी महत्त्वाचा निकाल सुनावत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच चाळीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सक्षम कारावास असाही निकाल त्यांनी दिला.
याबाबत पार्श्वभूमी अशी की, हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आरोपी नामे अजय रमेश सोनवणे रा. बदनापूर, ता. बदनापूर, जि.. जालना ह.मु.पो. सिध्दार्थ नगर, आखाडा बाळापूर यांनी प्लॉट घेण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून दि.१६ एप्रिल२३ रोजी दुपारी १:०० ते १:३० वा. सुमारास त्यांच्या राहत्या घरात त्याची सासू, पत्नी, व मेहुणीची मुलगी समिक्षा यांना बाजेच्या लाकडी ठाव्याने मारहान करून आरोपीचा मेहुणा फिर्यादी सुरज नागोराव खिल्लारे यांची आई नामे लताबाई खिल्लारे हिचे डोक्यात वाजेच्या ठाव्याने मारून गंभीर जखमी करून जिवे मारले. तो एवढ्यवरच थांबला नाही तर फिर्यादीची बहिण म्हणजेच आरोपीची पत्नी अर्चना हिच्या डोक्यात देखील बाजेच्या ठावा मारून तिलाही गंभीर जखमी केले. तसेच आरोपीच्या मेहुणीची मुलगी कु .समिक्षा हिला सुध्दा हातावर बाजेच्या ठाव्याने मारून गंभीर जखमी केले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर यांनी फिर्यादी सुरज खिल्लारे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर २९४/२०२३, कलम ३०२,३२६,३२४ भारतीय दंड विधानान्वये नोंद करण्यात आला.
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ हिंगोली, सौ. सरोज एन. माने/गाडेकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सदर प्रकरणात मा. न्यायालयात जिल्हा सरकारी वकील श्री.एन.एस. मुटकुळे यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले व उपरोक्त निकाल सुनावला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, हिंगोली सौ. सरोज एन. माने/गाडेकर यांनी आज दिनांक २९/०९/२०२५ रोजी सत्र खटला क. ४६/२०२३, महाराष्ट्र शासन विरूध्द अजय सोनवणे ह.मु. सिध्दार्थ नगर, आखाडा बाळापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली या आरोपीस कलम ३०२ भा.दं.वि. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व रुपये ३०,०००/- दंड, दंड न भरल्यास ९ महिने सश्रम कारावास तसेच कलम ३२४ भा.दं.वि.मध्ये १ वर्षे शिक्षा व रूपये १०,०००/- दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर जमा दंडापैकी रूपये ३०,०००/- नुकसान भरपाई म्हणून जखमी अर्चना अजय सोनवणे व जखमी मुलगी समिक्षा सुमित पाईकराव यांना देण्यात यावी असा आदेश झाला. तसेच महत्वाचे मा. न्यायालयाने असाही आदेश दिला की, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून योग्य ती आर्थिक मदत करावी.
उपरोक्त प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी बाजु मांडली व अंतिम युक्तीवाद केला तसेच त्यांना एस. डी. कुटे, सहायक सरकारी वकील, श्रीमती सविता देशमुख, सहायक सरकारी वकील, यांनी सहकार्य केले व कोर्ट पैरवी पोलीस कॉ. श्रीमती सुनिता जयवंतराव धनवे, ब.नं.१८९, पो. स्टे. आखाडा बाळापूर यांनी विशेष सहकार्य केले.


إرسال تعليق