खामगांव येथे २८ सप्टेंबर रोजी भीम गीतांचा कार्यक्रम
खामगांव :- (जनोपचार न्यूज नेटवर्क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, यावर्षी खामगांव येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी वेळ सायंकाळी ०६:०० वाजता स्थानिक सम्राट अशोक नगर, बाळापूर फैल येथे भव्य भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला आणि त्यांच्या मानवतावादी विचारांना संगीताच्या माध्यमातून वंदन करण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे महत्त्व आणि भारतीय समाजाला दिलेले त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संविधान दादा मनोहरे हे करतील. हजारो अनुयायांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन अशोक क्रीडा मंडळ बाळापूर फैल यांच्या वतीने करण्यात आले. अशी माहिती मुन्ना सरकटे यांनी दिली.


Post a Comment