निरांतर अन्नदान सेवेला तीन हजार दिवस पूर्ण "अन्नछत्र" च्या निरंतर सेवेची ९ वर्षे 

नागरिकांच्या सहकार्यातून चालते अन्नछत्र.....
आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा अथवा मित्राचा वाढदिवस, पुण्यतिथी, जयंती, स्मृतिदिन आणि अथवा कुठल्याही उत्सवानिमित्त मिळणाऱ्या दान राशी तून हा अन्नछत्र प्रकल्प राबवला जातो. यासाठी खामगाव शहरातून, परिसरातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, देशातून एवढेच नव्हे तर अगदी परदेशातूनही दानदात्यांचे सहकार्य मिळत आहे आणि त्यामुळेच हा प्रकल्प गेली नऊ वर्षे  सुरू आहे.

"अन्नदान श्रेष्ठ दान" या तत्वाला अनुसरून लायन्स क्लब खामगाव च्या वतीने स्थानिक सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांसाठी एक वेळचे भोजन देण्याचा प्रकल्प दिनांक १७/६/२०१७ पासून सलग ३००० दिवस निरंतर सुरु असून हे या सेवेचं ९ वे वर्ष आहे. कोविड च्या काळातही या प्रकल्पासाठी विशेष परवानगी मिळाली होती. बाहेरगावाहून सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत आहे.

जनोपचार मध्ये जाहिरात फक्त शंभर रुपये

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब खामगाव ची टीम सतत कार्यरत असते यामध्ये अध्यक्ष तुषार कमानी सचिव डॉ गिरीश पवार कोषाध्यक्ष कुणाल भिसे यांचे सह प्रकल्प प्रमुख किशोर गरड, दिनेश गांधी,, गिरीश धर्मरमठोक अशोक केला, शंकर परदेशी, लुकेश मुदलियार, मितेश कमानी, नरेंद्र सिंग छाबरा रमेश भुतडा सागर गुर्जर यांचेसह लायन्स क्लब खामगाव चे सदस्य परिश्रम घेतात.

तुम्हालाही अन्नदारासाठी सहकार्य करायचे असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधा

 किशोर गरड ९९२२८६२७०१, दिनेश गांधी ९४२२१८००६२, गिरीश धरमठोक ९४२२८८४५७० किंवा मितेश कमानी ९८२२८८८५६१ यांच्या शी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व अन्नदानाचे पुण्य कमवावे असे आवाहन लायन्स क्लब खामगावच्या वतीने करण्यात येत आहे.


Post a Comment

أحدث أقدم