नागपुर येथे मध्यभारत ऑयल मिल असोसिएशनचे भव्य अधिवेशन संपन्न

ऑइल मिल उद्योजकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार -- मंत्री -आकाश फुंडकर 

जनोपचार न्यूज नेटवर्क:- नागपुर येथे आयोजित मध्यभारत ऑयल मिल असोसिएशनच्या भव्य अधिवेशनात देशभरातून ६०० हून अधिक ऑयल मिल मालक, ब्रोकर्स, ट्रेडर्स आणि जिनर्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री  आकाश भाऊ फुंडकर, भाजप नागपूर अध्यक्ष व माजी महापौर श्री. दयाशंकरजी तिवारी, तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत मोहता यांची उपस्थिती लाभली.महसूल मंत्री चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी सर्व उधोजाकांना सर्वोतपरी मदत करू केंद्रात जावं लागेल तरी जाऊ तसेच कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी नवीन कामगार कायद्याविषयी समजावून सांगितले व सरकी ढेप वर कर  या बाबत केंद्र सरकार कडे आपण निवेदन देऊ व काम पडल्यास दिल्ली ला पण जाऊ असे आश्वासन दिले व मध्य भारत ऑइल मिल अससोसिएशन ने सर्व दलाल बंधू व कापसाच्या संबंधित सर्व उद्योजकाना एका ठिकाणी आणण्याचं काम केलंय आणि ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुलभ झालं 

अधिवेशनात ऑयल मिल उद्योगाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषत: हे अधोरेखित करण्यात आले की, ऑयल मिल व जिनिंग उद्योग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांच्यातील समन्वय वाढवणे काळाची गरज आहे.सर्व मान्यवरांनी व सहभागी प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट व्यवस्थेचे कौतुक केले.

या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विपिन अग्रवाल, उपाध्यक्ष श्री. राधेश्यामजी सुधा आणि श्री. मनीष शाह, सचिव श्री. तपेशचंद्र राणा तसेच श्री. विनोद मुथा, श्री. प्रतापजी ठाकूर, श्री. अविनजी अग्रवाल, श्री. चंदनजी मुथा, श्री. सतीशजी राठी, श्री. विजयजी अग्रवाल, श्री. करमचंद ठाकूर, श्री. पी. के. श. अग्रवाल, श्री. संजयजी अग्रवाल, आकिब चीनी आणि श्री. कपिलजी शर्मा यांचे विशेष योगदान उल्लेखनीय राहिले.अधिवेशनाच्या शेवटी, आगामी कार्यकाळासाठी सर्वानुमते श्री. गणेशजी अग्रवाल यांची असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post