कृषी संकुलच्या गेटवर लागले
मटन, चिकन थाळीचे बोर्ड
खामगाव शहरात सध्या फलक युद्ध सुरू आहे. यात हॉटेल व्यावसायिक देखील मागे नाहीत. चक्क विकास महर्षी मा श्री विलास रावजी देशमुख कृषी संकुलाच्या गेटवर लागलेल्या हॉटेल निशांत च्या जाहिरात फलका विषयी चर्चा सुरू आहे ."मटन थाळी, चिकन थाळी व फॅमिली साठी खास स्वतंत्र व्यवस्था" अशीही जाहिरात या फलकावर टिकण्यात आली आहे. हॉटेल मालका ने फलक लावण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे काय? हा वेगळा विषय असला तरी गेटवर लावलेल्या या फलकाची (लावण्याच्या हेमतीची) चर्चा सुरू आहे.

إرسال تعليق