कॉलेज ऑफ मेनेजमेंट मध्ये बी.ए.,बी.कॉम, बी.एस्सी व इतर शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस मुदत
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:. लक्ष्मीनारायण शैक्षणिक बहु उद्देशीय ग्राम विकास संस्थे अंतर्गत कॉलेज ऑफ मेनेजमेंटमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेण्याकरिता मुदत वाढ करण्यात आली आहे. बरेच विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यापासून वंचित असल्याचे लक्षात घेता कॉलेज ऑफ मेनेजमेंटचे प्राचार्य आणि विद्यार्थी यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मा. कुलगरू यांना प्रवेश घेण्यापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता मुदत वाढ देण्यात या बाबत मागणी केली असता जे बी.ए.,बी.कॉम, बी.एस्सी आणि एम.एस्सी या विद्याशाखेत प्रवेश घेणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यानकरिता मा. कुलगुरूंचे अधिकारामध्ये यांनी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवेश प्रक्रियेत वाढ करून दिली आहे.
जे विद्यार्थी बी.ए.,बी.कॉम, बी.एस्सी आणि एम.एस्सी या विद्याशाखेत प्रवेश घेण्यापासून वंचित राहिले असतील अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑफ मेनेजमेंटमध्ये येथे आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश प्रक्रिया ही कॉलेज ऑफ मेनेजमेंट कार्यालयात केली जात आहे. विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन कॉलेज चे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान व प्राचार्य यांनी केले आहे.

إرسال تعليق