लोखंडकार यांनी केले शंकर राऊत यांचे कौतुक
खामगाव ( जनोपचार न्यूज नेटवर्क) – उमिदेच्या काळात झालेल्या अपघातामुळे कायमचे अपंग झालेले श्री. शंकर राऊत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हिवरखेड येथे नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या व्यवसायाचे उद्घाटन प्रहार पक्षाचे संपर्क प्रमुख गजानन लोखंडकार यांच्या शुभहस्ते झाले.
लोखंडकार यांनी या वेळी बोलताना शंकर राऊत यांच्या जिद्दीचे कौतुक केले. “राऊत यांची जीवनाशी केलेली लढाई आणि स्वावलंबनाचा स्वीकार हा समाजासाठी प्रेरणादायी आदर्श आहे,” असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रल्हाद नारे, बाळु राऊत, श्रीराम खंडारे, महादेव घाईट, शालीग्राम इंगळे, गुणांची राऊत, मनोहर फुंडकर, पंढरी राऊत, निवृत्ती राऊत, गजानन देशमुख, शरद भगत, नारायण फुंडकर, शिवा, आप्पा भागवत, सागर फुंडकर, नितीन कडाळे, रवि फुंडकर, विशाल पवार, रवि घोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment