लायन्स क्लब संस्कृती तर्फे गणपती विसर्जनाच्या वेळी पोलिसांना जेवणनाचे पाकीट वाटप


खामगावात गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने ५०० जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. हा क्लबचा एक महत्त्वाचा उपक्रम असून, गेली चार वर्षांपासून तो राबवला जात आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कष्ट करतात, त्यांच्या या योगदानाला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीसारख्या मोठ्या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. अशा वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यापासून ते गर्दीवर नियंत्रण मिळवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पोलीस चोख पार पाडतात. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी ते गस्त घालतात आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचवतात. पोलिसांच्या याच निस्वार्थ आणि समर्पित प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लबने जेवण वाटपाचा हा छोटासा प्रयत्न केला.
हा उपक्रम ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता चिंतामणी गणपती मंदिर, महाकाळ चौकाजवळ पार पडला. या प्रकल्पाचे प्रमुख एमजेएफ लाॅ अभय अग्रवाल, लाॅ शैलेश शर्मा, आणि लाॅ निशिकांत कानूंगो हे होते. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

Previous Post Next Post